जळगावचा दुचाकी चोरटा अकोला एलसीबीच्या ताब्यात

On: March 26, 2021 10:50 AM

जळगाव : जळगाव शनीपेठ भागातील रहिवासी असलेल्या रोहित पंडीत निंदाने (21) शनीपेठ जळगाव यास अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातून अटक केली आहे. अकोला जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. याप्रकरणी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत जळगाव येथील म्होरक्या रोहित पंडीत निंदाने याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे दोघे साथीदार सैय्यद रोशन सैय्यद कादीर (35) आणि सैय्यद आझा उर्फ बब्बू सैय्यद कादीर (43) दोघे रा. नांदुरा – बुलढाणा यांची नावे पुढे आली. .

तिघांनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांच्याकडून चोरीच्या एकुण 17 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या मुद्देमालात जळगाव जिल्ह्यातील नऊ आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन दुचाकी असल्याचे म्हटले जात आहे.एकुण 5 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल अकोला एलसीबीचे पो.नि. शैलेश सपकाळ व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, अश्वीन मिश्रा, किशोर सोनोने, वसीम शेख, शक्ती कांबळे, अक्षय बोबडे, अनिल राठोड, प्रवीण कश्यप आदींनी हस्तगत केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment