पाकीटमार भुसावळ पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : बसमधे चढत असतांना प्रवाशाच्या खिशातील पाकीट चोरुन नेणा-या चोरट्यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. प्रवाशाच्या पाकीटातील 21300 रुपयांपैकी 9500 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात पोलिस पथकाला यश आले आहे.

गोविंद कालुराम कहर (38) रा. ढकोची पोस्ट.खालवा ता.हरसोद जि.खंडवा मध्य प्रदेश हा प्रवासी भुसावळ बस स्थानकावरुन औरंगाबाद जाण्यासाठी बसमधे चढण्याच्या प्रयत्नात असतांना त्याच्या पॅंटच्या खिशातील पाकीट चोरीला गेल्याचा प्रकार त्याच्या लक्षात आला. आपले पाकीट चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर गोविंद कहर या प्रवाशाने पुढील प्रवास स्थगीत करत भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन गाठले. दरम्यान परिसरातील लोकांच्या चर्चेतून त्याला समजले की सदर चोरीचा प्रकार हा हसन अली नियाज अली उर्फ हसू रा. पापानगर इराणी मोहल्ला याने केला आहे. या प्रकरणी गोविंद कहर याने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला हसन अली नियाज अली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 114/21 भा.द.वि. 379 नुसार दाखल करण्यात आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, पो.कॉ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने त्याला सापळा रचून जाम मोहल्ला भागातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस कोठडी दरम्यान आरोपी हसन अली याच्या ताब्यातून त्याने चोरलेल्या 21300 रुपयांपैकी 9500 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. पुढील तपास पो.हे.कॉ.संजय भदाने करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here