तिघा वाळू व्यावसायीकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : कलींगड विक्रेता असलेल्या शेतक-याच्या मुलीसमक्ष तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी तसेच दादागिरी करत बळजबरी शेतातील कलींगड तोडण्याचा प्रकार करुन विरोध केला असता चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध मध्यरात्री नशिराबाद पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले तिघे वाळू व्यावसायीक असल्याचे समजते.

काल दुपारी सुमारे साडेपाच वाजेच्या सुमारास सुनसगाव रस्त्यावरील शेतानजीक एक शेतकरी आपल्या अल्पवयीन मुलीसह कलींगड विक्री करण्यासाठी उभा होता. त्यावेळी चारचाकीने जात असलेले तिघे जण खाली उतरले. त्यांनी कलींगड विक्रेत्या शेतक-याकडे मोठ्या कलींगडाची मागणी केली. आपल्याकडे मोठ्या आकाराचे कलींगड नसल्याचे सांगितले असतांना देखील त्यांनी बळजबरीने शेतातील मोठ्या आकाराचे 9 कलींगड तोडले. या कलींगडाचे आठशे रुपये मागीतले असता तिघांना राग आला. त्यांनी कलींगडाची रक्कम देण्यास शेतक-यास नकार दिला. त्यामुळे शेतक-याने ते कलींगड त्यांच्याकडून परत घेतले.

संतप्त झालेल्या तिघा जणांनी कलींगड विक्रेत्यास चापटा बुक्क्यांनी मारहाण करत छातीत लाथ मारली. यावेळी शेतक-याची सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी हजर होती. तिच्या मनाला या घटनेमुळे वेदना झाल्या. दरम्यान त्यातील एका जणाने मुलीला बघून हातवारे करत अश्लील वर्तन केले. त्यानंतर सर्वजण त्यांच्या ताब्यातील वाहनाने निघून गेले. त्यावेळी शेतातील दोघा जणांनी त्या चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. एकाने त्यांना अडवून शेताजवळ पकडले.

शेतक-याच्या एका सह्का-याने त्या लोकांना ओळखले. त्यांची नावे बाळू चाटे, विठ्ठल पाटील व सुपडु सोनवणे असल्याचे कलींगड विक्रेत्या शेतक-यास समजले. याप्रकरणी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास नशीराबाद पोलिस स्टेशनला कलींगड विक्रेत्याच्य फिर्यादीनुसार तिघा जणांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भा.द.वि. 354(अ), 447, 323, 504, 506 तसेच बाल लैंगीक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा जणांना अद्याप अटक करण्यात आली नसून पुढील तपास पो.उ.नि. साळुंखे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here