खोकल्याचे औषध समजून पोलिसाने घेतले विष

बारामती : खोकल्याचे औषध समजून शेतात पिकांवर फवारणी करण्याचे औषध घेतल्यामुळे पोलिस कर्मचा-याचा उपचारादरम्यान जिव गेल्याची घटना बारामती येथे घडली आहे. पोपट दराडे असे बारामती ग्रामीण पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या त्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे.

गेल्या दोन दिवसापासून खोकला येत असल्यामुळे घरी आल्यावर खोकल्याचे औषध समजून शेतातील पिकांवर फवारणी करण्याचे (टू फोर्टी) हे औषध नजरचुकीने पोपट दराडे या कर्मचा-याने प्राशन केले. काही वेळाने दराडे यास त्रास जाणवू लागला. खोकल्याच्या औषधा एवजी चुकीचे औषध घेतल्याचे समजल्यानंतर कुटूंबातील सदस्यांनी पोपट दराडे यास तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान पोपट दराडे यांचा मृत्यू झाला. इंदापुर तालुक्यातील अकोले येथील मुळ रहिवासी असलेल्या दराडे यांना पत्नी व दोन मुले आहेत.

1 COMMENT

  1. समजदार व एक पोलीस खात्यातील व्यक्ती कडून अशी चुक होणे कदापिही शक्य नाही.
    कारण पोलिस झालेली व्यक्ती पावलोपावली सावधगिरीने वागत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here