फिल्मी पोलीस आणि खरा पोलिस यात फरक – मुख्यमंत्री ठाकरे

uddhav thackeray

मुंबई : सिनेमातील आणि वास्तविक जिवनातील पोलिसात जमीन आस्मानचा फरक असतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. नाशिक येथील पोलिस प्रबोधिनीच्या 118 व्या दिक्षांत सोहळ्यात पोलिस उप निरीक्षक पदाचे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या नुतन पोलिस उप निरीक्षक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत होते.

ख-या पोलिसांना जमीनीवर राहून कामकाज करावे लागते. पोलिसांच्य प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो व त्यांना उत्तर द्यावे लागते. पोलिसांनी प्रशिक्षणासोबतच प्रसंगावधान बाळगणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलतांना म्हटले. खडतर प्रशिक्षण पुर्ण केल्यामुळे आपल्या अंगी जल्लोष येणे स्वाभावीक आहे. मात्र अशा प्रकारे बेहोश होऊन चालणार नाही असा महत्वाचा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी नव्या पोलिस उप निरीक्षकांना दिला. कालपर्यंत तुम्ही तुमच्या कुटूंबाचे होता मात्र आता हे राज्य तुमचे कुटूंब आहे. या कुटूंबाला तुमचा आधार राहणार आहे. तुमच्या स्वप्नात महाराष्ट्राचे स्वप्न मिसळून बघावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले.

कोरोना ज्याप्रमाणे आपले रुप बदलत आहे त्याप्रमाणे गुन्हेगारी देखील आपले रुप बदलत आहे. गुन्हेगारी आता ऑनलाईन झाली असली तरी ख-या गुन्हेगारांपर्यंत पोहचून बेड्या घालाव्या लागणार आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यामुळे नुतन पोलिस उप निरीक्षकांनी धुंद होऊन जल्लोष केल्याची घटना सोशल मिडीयासह प्रिंट मिडीयात व्हायरल झाली होती. त्या घटनेचा आधार घेऊन मुख्यमंत्र्यांनी नुतन पोलिस उप निरीक्षकांना भानावर राहून काम करण्याचा सल्ला दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here