२५०० रुपयांत कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट

काल्पनिक छायाचित्र

रुग्णालयाची एक्स्ल्युझिव्ह ऑफर

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्हयात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. आतापर्यंत जवळपास हजाराच्या वर कोरोना रुग्ण याठिकाणी आढळून आले आहेत. याठिकाणी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा आढळून येत असल्याचा देखील आरोप होत आहे. शहरातील एका खासगी दवाखान्यात अवघ्या २५०० रुपयात रुग्णांना कोरोना निगेटीव्ह अहवाल देण्यात येत असल्याचा प्रकार एका घटनेतून उघड झाला आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे आरोग्य विभागाला जाग आली आहे. सीएमओ डॉ. राजकुमार यांनी या प्रकरणी नर्सिंग होमचे मालक आणि संचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लिसाडी गेट परिसरातील न्यू मेरठ नर्सिग होममधील हा प्रकार असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसते. व्हायरल झालेल्या व्हिडीओत नर्सिंग होममध्ये एक व्यक्ती कोरोनाबाबत रुग्णालयातील डॉक्टरसोबत संवाद साधत आहे.

हे हि वाचा पित्याने मुलावर केला प्राणघातक हल्ला..!!

व्हिडीओमधील संवादानुसार जिल्हा प्रशासनचा शिक्का असलेला रिपोर्ट रुग्णास मिळेल व तो निगेटीव्ह असेल असे संवाद त्या व्हिडीओत आहे. जिल्हा रुग्णालयाचा अहवाल एक आठवड्यात मिळेल असे देखील त्यात संवाद आहेत. चाचणी केली तर रिपोर्ट पॉझिटीव्ह येण्याची दाट शक्यता असते.

मात्र २५०० रुपये दिल्यास रिपोर्ट निगिटीव्ह येईल असे त्या व्हिडीओत म्हटले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ नंतर आरोग्य विभागाने कारवाई सुरु केली आहे. संशयीत आरोपी असलेल्या नर्सिंग होम संचालक शाह आलम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अनिल ढिंगारा यांनी न्यू मेरळ रुग्णालयास तात्काळ सील करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here