महाराष्ट्रात यापुढे विदेशी कोरोना लसींची आयात

मुंबई : यापुढे महाराष्ट्रात विदेशातून कोरोना लसींची आयात केली जाईल. कोरोना लसीकरणासाठी निधीची कमतरता भासल्यास राज्याच्या सर्व खात्यातील फंडाचा वापर केला जाणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राज्यासाठी दररोज सात लाख लसींची गरज आहे. असे असतांना लसींच्या पुरवठ्यावर केंद्राकडून बंधने घालण्यात आली आहे. दररोज केवळ तिन लाख लसींचा पुरवठा केंद्राकडून केला जात असल्याचे राज्य सरकारने यापुर्वी सांगितले आहे. ब्रिटनचा आदर्श नजरेसमोर ठेवत कोरोनावर नियंत्रण आणले जाणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षासह या वर्षी ब्रिटनमधे कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. ब्रिटनमधे जवळपास साठ टक्के लसीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. कोरोना लसीकरणासह आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी लागणा-या खर्चाचा अंदाज राज्याकडून घेण्यात येत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here