1 मे पर्यंत लग्न आटपा दोन तासात 25 जणांच्या हजेरीत

काल्पनिक छायाचित्र

मुंबई : आज 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत “ब्रेक द चेन” अंतर्गत कडक निर्बंध असलेले लॉकडाऊन सुरु होत आहे. रात्री आठ वाजेपासून लागू होत असलेली सुधारित नियमावली प्रशासनाकडून जाहीर झाली आहे. लग्न समारंभ अवघ्या 25 नातेवाईकांच्या हजेरीत दोन तासाच्या आत पार पाडावा लागणार आहे. अन्यथा पन्नास हजार रुपयांचा दंड होणार आहे. एका राज्यातून दुस-या राज्यात केवळ अंत्यसंस्कार व अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येईल. अशा अत्यावश्यक प्रवासासाठी पासची आवश्यकता नाही.

मुंबई उपनगरीय रेल्वेत केवळ म.न.पा. कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्गालाच प्रवास करता येणार आहे. मुंबई शहरातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी वाहनांना कलर कोड सिस्टीमची अंमलबजावणी केली जाणाराहे. वैद्यकीय सेवेतील कर्मचा-यांसाठी लाल रंग, भाजीपाला वाहतुकीसाठी हिरवा रंग, अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी पिवळा रंग असलेले स्टीकर्स अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व बस थांब्यांवर उतरणाऱ्या प्रवाशांना चौदा दिवसांच्या होम क्वारंटाईनचा शिक्का हातावर मारण्याची जबाबदारी संबंधीत बस व्यवस्थापनाची राहील.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here