पाचोरा प्रा. आरोग्य केंद्रात कोविड सेंटरसाठी सचिन सोमवंशी आग्रही

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटरची मागणी कॉंगेसचे धडाडीचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. त्यासाठी ते आग्रही आहेत. पाचोरा तालुक्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेता शहरात आणि ग्रामीण भागातील जनतेचे खूप हाल होत आहेत. त्यातच खाजगी कोविड सेंटर मध्ये पैशा अभावी काहींना जीव गमवावा लागला आहे. आधीच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक हानी झाली आहे त्यामुळे तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करुन ऑक्सीजन बेड उपलब्ध करुन देण्याची मागणी कॉंग्रसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ यांच्याकडे केली आहे.

यावेळी निवेदन देऊन चर्चा करतांना शिष्टमंडळात तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ फिरोज शेख, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते. यावेळी नवीन कोविड सेंटर लवकरच सुरु करण्यासह लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्रात पहीला प्रयोग करण्याचे आश्वासन डॉ वाघ यांनी दिले.

यावेळी कर्मचारी वर्गासह रुग्णांना कॉग्रेस पक्षाच्या वतीने मास्कचे किट डॉ. वाघ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. चर्चेदरम्यान ऑक्सीजनसाठी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी लागलीच कॉन्टॅक्टर अबुलेज शेख यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी डॉ. वाघ यांना ऑक्सीजन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. तालुक्यात कोरोना महामारीत सरकारी कोविड सेंटरची गरज असल्याचे मत सचिन सोमवंशी यांनी व्यक्त केले. कोरोना महामारीत प्रत्येक कॉग्रेस कार्यकर्त्याने ग्रांउड लेवलवर कार्य करण्याचे निर्देश सोनियाजी गांधी व खा. राहुल गांधी यांच्यासह प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here