व्हॉटसॲप गृप ॲडमीनला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई : सोशल मीडियावर विविध ब-या वाईट पोस्ट प्रसारीत होत असतात. त्यात काही पोस्ट समाजविघातक तर काही आक्षेपार्ह देखील असतात. काही आक्षेपार्ह पोस्ट बाबत व्हाटसअ‍ॅप गृप अ‍ॅडमीन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात गृप अ‍ॅडमीनला दोषी मानले होते.

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्वाचा निर्णय देत गृप अ‍ॅडमीनला दिलासा दिला आहे. सन 2016 मधील गोंदीया जिल्ह्यातील एका प्रकरणात ग्रुपमधील एका सदस्याने एका महिला सदस्यासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी संबंधीत आरोपीसह व्हाट्सॲप ग्रुप ॲडमिनला देखील जबाबदार धरत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या प्रकरणी सुनावणी सुरु असतांना न्या. झेड.ए. हक आणि न्या.अमित बोरकर यांनी गृप ॲडमिनचा गुन्हा रद्दबातल करत मोठा दिलासा दिला आहे. गृप सदस्यांच्या मताशी ॲडमिनचा कुठलाही संबंध दिसत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे आणि एखाद्याच्या वैयक्तिक मेसेजला व्हाटसॲप गृप ॲडमिनला जबाबदार धरता येणार नसल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here