पत्रकार,आरटीआय कार्यकर्ता,निलंबित पोलिसासह महिलेवर खंडणीचा गुन्हा

काल्पनिक छायाचित्र

पुणे : बांधकाम व्यावसायीकास खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देवून बदल्यात २ कोटी रुपये व जागा देण्याची खंडणी मागितल्याची घटना पुणे येथे घडली. या घटने प्रकरणी कोथरुड पोलिसांनी पत्रकार, आरटीआय कार्यकर्ता, निलंबित पोलीस कर्मचारी व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

निलंबित पोलीस कर्मचारी शैलेश हरिभाऊ जगताप, पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन, आरटीआय कार्यकर्ते रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे, अमोल सतीश चव्हाण व एक महिलेवर हा गुन्हा दाखल झाला आहे.

बांधकाम व्यावसायिक सुधीर वसंत कर्नाटकी (६४) रा. शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरुड यांनी कोथरुड पोलिसात फिर्याद दिली. हा प्रकार नोव्हेंबर २०१९ या महिन्यात घडला होता. या घटनेतील महिलेने यापूर्वी तक्रारदार सुधीर कर्नाटकी यांच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा हिंजवडी पोलिसात दाखल केला आहे.

सुधीर कर्नाटकी यांच्य फिर्यादीनुसार या महिलेने त्यांच्याशी असलेल्या संबंधाचा गैरफायदा घेतला आहे. सदर महिला व सुधीर कर्नाटकी यांच्या संयुक्त नावाने असलेला फ्लॅट या महिलेने बळजबरी स्वत:च्या नावावर करुन घेतला आहे. फिर्यादीत पुढे म्हटल्यानुसार माझी सुपारी देऊन मारण्याची धमकी दिल्याने फ्लॅट नावावर करुन दिला. त्यानंतर महिलेने रवींद्र ब-हाटे (आरटीआय कार्यकर्ते), शैलेश जगताप(निलंबीत पोलिस) यांचा धाक दाखवला.

आपल्या इच्छेविरुद्ध करारनाम्याद्वारे आपण खंडणी रुपाने फ्लॅट महिलेला दिला. तसेच ८ हप्त्याने ६ लाख रुपये देण्याचे देखील ठरले. एवढे झाल्यावर देखील २ कोटी रुपये व रास्ता पेठेची जागाही द्यावी लागणार असल्याची धमकी दिली असे सुधीर कर्नाटकी यांचे म्हणणे आहे. कर्नाटकी यांच्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलिसांनी ३८६, ३८८, ३८९, ५०६(२), १२० (ब), ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here