15 मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध घोषित

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत ठाकरे सरकारने आपत्कालीन कायद्याला अनुसरुन 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लावले असल्याची घोषणा केली आहे. याबाबत अधिकृत जीआर काढण्यात आला आहे.

सकाळी भाजी बाजारात उसळणारी गर्दी लक्षात घेता लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवून तो प्रभावीपणे अंमलात आणण्याची सुचना सर्व मंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत केली. राज्यातील सर्व किराणा, भाजीपाल्यांची दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी), कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व दुकाने, कृषी संबंधीची दुकाने, पाळीव प्राण्याची खाद्य दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 अशा चार तासांच्या कालावधीत सुरु राहतील. या सर्व दुकानांना होम डिलीव्हरीची सवलत देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व सलून, ब्युटी पार्लर, शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स, क्रीडा संकुले, धार्मिक स्थळे बंद राहतील. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांना परवानगी दिलेली नाही. विवाहासाठी अवघ्या 25 जणांच्या हजेरीला परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी केवळ विस माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असून सर्व खासगी कार्यालये बंद राहणार आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here