औरंगाबाद नगर रस्त्यावर कारचा झाला कोळसा

औरंगाबाद : औरंगाबाद नगर रस्त्यावरील तिसगाव फाट्यानजीक असलेल्या रेल्वे पुलाच्या बाजुला आज सकाळी कार (एमएच 20 बीवाय 3307) जळून खाक झाली आहे. या कारमधील चौघेजण तात्काळ कारच्या बाहेर आल्यामुळे त्याचा जिव बालंबाल वाचला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी आगीत कारचा जणू कोळसा झाला. या घटनेमुळे वाळूजच्या दिशेने जाणारी वाहतुक ठप्प झाली होती.

डॉ. दिपाली मोरे यांच्या वडीलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या अस्थींचे कायगाव येथे विसर्जन करण्यासाठी चौघेजण कारने जात होते. यात दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश होता. सीएनजी कारने रेल्वे उड्डानपुलानजीक अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे जिवीतहानी झाली नाही मात्र कार जळून खाक झाली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here