आयपीएलचे उर्वरित सामने झाले रद्द

नवी दिल्ली : सर्वत्र कोरोना विषाणूने कहर केला असतांना आयपीएल सामने सुरु होते. मात्र कोरोनाने आयपीएलला देखील आपल्या कक्षेत सामावण्याची तयारी सुरु केल्याचे दिसताच उर्वरीत सामने रद्द करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली आहे. सामन्यांमधील खेळाडूंसाठी बायो बबलचे नियम होते तरीदेखील त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. दरम्यान कालचा आरसीबी विरुद्ध केकेआर सामना रद्द करण्यात आला होता. आता दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा या खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आताच्या वेळापत्रकानुसार खेळण्यात येणारे पुढील सामने रद्द करण्यात आले आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here