रा.कॉ.आमदाराचा पुत्र अटकेत

On: May 27, 2021 1:31 PM

पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील राष्टवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा पुत्र सिद्धार्थ यास अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी रत्नागिरी येथून त्याच्या तिघा साथीदारांसमवेत ताब्यात घेत अटक केली आहे. सिद्धार्थ हा गेल्या काही दिवसांपासून फरार असल्यामुळे व त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याने हवा होता. पोलिस त्याच्या मागावरच होते.

12 मे रोजी तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यास मारहाणीसह हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली सिद्धार्थ याच्याविरुद्ध पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार पुत्रास अटक होत नसल्यामुळे जनतेत टीका होण्यास सुरुवात झाली होती. अखेर आमदार पुत्राला अटक झाली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment