जमावाच्या हल्ल्यात पोलिस निरीक्षकासह कर्मचारी जखमी

On: May 28, 2021 9:38 PM

सोलापूर : अवैध हातभट्टी अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे आज सायंकाळी घडली. या हल्ल्यात पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे आणी कर्मचारी विठ्ठल बंदुके असे गंभीर जखमी झाले आहेत.दोघा जखमींवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

वेळापूर येथील पारधी समाजाच्या वस्तीवर अवैध हातभट्टीचा अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस पथक कारवाईसाठी त्याठिकाणी गेले होते. कारवाई सुरु केल्यानंतर त्या ठिकाणी एकच हल्लकल्लोळ माजला. या गदारोळात जमावाने पोलिस पथकावर थेट हल्ला चढवला. आपल्यावर होणारा हल्ला पोलिसांनी परतवण्याचा पुरेपुर प्रयत्न सुरु केला. या निकराच्या लढ्यात पोलिस निरीक्षकासह कर्मचारी मोठ्या प्रमाणात जखमी होण्याची घटना घडली. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक झाली नसली तरी लवकरच कारवाई होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment