लग्नाचे आमिषाने परिचारिकेवर अत्याचार

On: August 12, 2021 10:21 AM

परळी : खासगी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या विवाहित परिचारिकेस वेळोवेळी विवाहाचे आमिष दाखवत तिच्यावर गेल्या दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार करणा-या संशयीताविरुद्ध संभाजीनगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय गुलाब पवार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

शहरात असलेल्या कंडक्टर कॉलनी परिसरातील रहिवासी विवाहितेचा दोन वर्षांपूर्वी संजय पवार या तरुणासोबत परिचय झाला होता. दोघांची ओळख घनिष्ठ झाल्यानंतर संजयने तिच्याशी अंगलट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळू हळू लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत त्याने शरिरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर कालांतराने त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

परिचारिकेच्या दोन्ही मुलांना जिवे ठार करण्याची धमकी देखील त्याने दिली. याप्रकरणी विवाहीत परिचारिकेच्या तक्रारीनुसार  संभाजीनगर पोलिस स्टेशनला संशयीत आरोपी संजय गुलाब पवार (30) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी अधिकारी मोनाली पवार पुढील तपास करत असून तपास पथक आरोपीच्या मागावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment