वान्टेड आरोपी एलसीबीने घेतला ताब्यात

On: August 15, 2021 5:58 PM

जळगाव : फरार व वान्टेड आरोपींच्या शोध मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर पोलिस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

विलास सुपडू वाघोदे (वडगाव ता. रावेर) याच्याविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला गु.र.न.258/21 भा.द.वि. 380, 406 नुसार गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून विलास वाघोदे हा फरार होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार अशोक महाजन, अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी, चालक अशोक पाटील यांच्या पथकाने त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. तो घरी आला असल्याची गुप्त माहिती पथकाला समजली होती. पुढील चौकशीकामी त्याला रावेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment