पत्रकार दातीर खून प्रकरणातील आरोपी फरार

On: August 29, 2021 11:01 AM

अहमदनगर –  राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरणातील आरोपी कान्हू गंगाराम मोरे याच्यावर जिल्हा रुग्णालयात  वैद्यकीय उपचार सुरु असतांनाच तो पसार होण्यात यशस्वी झाला आहे.

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे 6 एप्रिल रोजी कारमधून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळाने त्यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात पोलिसानी लाल्या माळी या आरोपीला ताहराबाद, अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश, तौफिक शेख यास नाशिक तर कान्हू मोरे याला नगर औरंगाबाद राज्य महामार्गावरील नेवासा रस्त्यावरुन अटक केली होती.

कान्हू मोरे यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असतांना मुतखड्याच्या उपचारासाठी त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना पोलिसांना चकवा देत त्याने फरार होण्यात यश मिळवले आहे. त्याच्या मागावर पोलिस पथक आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment