मोफत नाश्त्याची मागणी व मारहाण करणारे दोघे अटकेत

जळगाव – नाश्त्याचे शंभर रुपये अगोदर द्यावे लागतील असे म्हटल्याचा राग आल्याने दोघा तरुणांनी नमकीन विक्रेत्यास लोखंडी कड्याने मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जळगाव सिंधी कॉलनी भागात बबलाराम नारायण तलरेजा यांचे नमकीन विक्रीचे दुकान असून ते नाश्ताची गाडी लावतात. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांच्या दुकानावर नाश्ता करण्यासाठी उमेश उर्फ मायकल कन्हैय्या नेतलेकर (रा. सिंगापूर कंजरवाडा – जळगाव) आणि आकाश नंदु लोहाळेकर (रा. नवभारत डेअरीजवळ नाथवाडा जळगाव) हे दोघे आले. दोघांची देहबोली बघून दुकानदार बबलाराम तलरेजा यांनी त्यांना नाश्त्याचे शंभर रुपये अगोदर द्यावे लागतील असे म्हटले. शंभर रुपये आगाऊ मागीतल्याचा राग आल्याने दोघा आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत उमेश उर्फ मायकल नेतलेकर याने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने बबलाराम तलरेजा यांना बेदम मारहाण केली होती. त्यात ते जखमी झाले.

या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला जखमी बबलाराम तलरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 562/21 भा.द.वि. 326, 323, 504, 34 नुसार दाखल करण्यात आला होता. पो.नि. शिकारे यांच्या पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग धर्मा पाटील, हे.कॉ.रमेश चौधरी, पोलिस नाईक गणेश शिरसाळे, मिलींद सोनवणे, योगेश बारी यांनी दोघा आरोपींना अटक केली. दोघांना न्या. ए.एस.शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड. निकम यांनी कामकाज पाहिले. उमेश उर्फ मायकल कन्हैय्या नेतलेकर याच्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनला विविध कलमांखाली चार गुन्हे दाखल आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here