दोघे मोबाईल चोरटे एलसीबीने केले अटक

On: September 6, 2021 9:31 PM

जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा मोबाईल चोरट्यांना पारोळा शहरातून अटक केली आहे. चेतन योगेश पाटील (22) शनी मंदीर चौक पारोळा व सागर रविंद्र पाटील (शनी मंदीर चौक पारोळा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा मोबाईल चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

दोन्ही चोरीच्या मोबाईल बाबत अनुक्रमे अमळनेर व भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. दोन्ही पोलिस स्टेशनचे मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांना पुढील तपासकामी अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सफौ विजय देवराम पाटील, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोहेकॉ संदिप श्रावण साळवे, पोना नंदलाल दशरथ पाटील, पोना किरण मोहन धनगर, पोना प्रमोद अरुण लाडवंजारी, पोना भगवान तुकाराम पाटील, पोकॉ सचिन प्रकाश महाजन यांनी तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील दोघा चोरट्यांविरुद्ध मोटार सायकल चोरीचे गुन्हे देखील दाखला आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment