मोबाईल चोरटे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात

On: September 11, 2021 6:55 PM

जळगाव – दोन वेगवेगळ्या कारवायांमधे जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. पहिल्या कारवाईत दोघांना अटक केली असून दुस-या कारवाईत एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले आहे.

प्रेमनगर येथील रहिवासी असलेले प्रशांत झाल्टे हे जिल्हापेठ हद्दीतील विवेकानंद बगीचा परिसरात 6 सप्टेबर रोजी गेले होते. त्यावेळी त्यांचा मोबाईल चोरीस गेला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात भोलासिंग जगदीशसिंग बावरी (तांबापुरा जळगाव) यास त्याच्या मोटारसायकलसह ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 सप्टेबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील भोलासिंग बावरी याच्यावर विस गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याप्रकरणी अजुन दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख (तांबापुरा जळगाव) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनला 17 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील अजुन एका आरोपीला अटक केली जाणार आहे.

पो नि रामदास वाकोडे यांच्या पथकातील हे कॉ महेंद्र बागुले, पो. कॉ मनोज पवार, हे कॉ फिरोज तडवी, हे कॉ तुषार जावरे, पो कॉ योगेश साबळे, पो कॉ समाधान पाटील, पो ना सलीम तडवी, पो ना संतोष सोनवणे, पो कॉ रेहान खान यांनी या कारवाईत सहभाग घेतला असून पुढील तपास हे. कॉ. महेंद्र बागुल करत आहे.

याशिवाय दुस-या घटनेत दासोपंत सुका भंगाळे हे जुने इलेक्ट्रीक साहित्य घेण्यासाठी शहरातील बि.जे. मार्केट परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल एका मुलाने चोरी करुन पळ काढला होता. भंगाळे यांनी पाठलाग करत त्याला पकडले होते. यावेळी पोलिस उप निरीक्षक कैलास पाटील, पो हे कॉ राजेंद्र पाटील यांची मदत झाली होती. या घटनेतील पंधरा वर्षाच्या बालकास ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विधी संघर्षीत बालकास विधी संघर्षीत समिती समक्ष हजर केले जाणार आहे. पुढील तपास पो ना संतोष सोनवणे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment