महिलेसोबत अश्लिल संभाषण – अधिका-याला मारहाण

On: September 11, 2021 7:46 PM

कल्याण : महिलेसोबत मोबाईलवर अश्लील संभाषण केल्यामुळे संबंधीत अधिका-यास संतप्त महिलांनी कल्याण येथे मारहाण केली आहे. मंत्रालयात काम करणा-या अधिका-यास चोप बसल्यामुळे कल्याण परिसरात खळबळ माजली आहे. शिवाजी आव्हाड असे त्या अधिका-याचे नाव असल्याचे समजते.

शिवाजी आव्हाड हे मंत्रालयातील इरिगेशन खात्यात कार्यरत आहेत. महिलेसोबत अश्लिल संभाषण झाल्यानंतर महात्मा फुले पोलिस स्टेशनला सदर अधिका-याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. केवळ प्रतिबंधात्मक कारवाई झाल्याचा राग मनात ठेवत संतापलेल्या महिलांनी आव्हाड यांना थेट चोप देत आपला राग शांत केला. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांमधे प्रसारीत होत असल्याचे देखील म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment