विस रुपयांसाठी खून करणारा अटकेत

On: September 12, 2021 10:02 AM

नाशिक – विस रुपये देण्यास नकार देणा-या मजुराच्या गळ्यावर कट्यारीने वार केल्याने मृत्यू झाल्याची घटना नाशिक येथे शुक्रवार 10 सप्टेबर रोजी घडली होती. या घटनेतील हल्लेखोर आरोपीस अटक करण्यात आली असून मयताची ओळख देखील पटली आहे. जखमी अवस्थेत जिव वाचवण्यासाठी मजुराने अर्धा किलोमीटर अंतर मार्गक्रमन केले होते. त्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पंचवटी पोलिसांनी संशयीत हल्लेखोरास अटक केली आहे.

शुक्रवारच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास पंचवटी परिसरातील सेवाकुंज येथे गंभीर अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इसमाबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्या माहितीच्या व रस्त्याने पडलेल्या रक्ताच्या डागाच्या आधारे घटनास्थळ शोधण्यात आले. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे मयताचे नाव सुनिल असून तो मजूर आहे. मिळेल ते काम तो करत होता. तो आडगाव नाका परिसरातील दुकानाच्या बाहेर रात्रीच्या वेळी झोपत होता. परिसरातील फिरस्त्यांकडून पोलिसांनी माहिती संकलीत केली.

अटकेतील आरोपीने मयतास बिडी पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र मयताने दिले नाही म्हणून संतापाच्या भरात आरोपीने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात तो मोठ्या प्रमाणात जखमी झाला. पंडीत रघुनाथ गायकवाड उर्फ पंड्या लंगड्या असे नाव सांगणा-या हल्लेखोरावर त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. बिडी पिण्यासाठी त्याने मयताला विस रुपये मागीतले होते. ते मिळाले नाही म्हणून त्याचा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या पथकातील कर्मचा-यांनी तपास केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment