औरंगाबाद – औरंगाबाद येथील कांचनवाडी परिसरात रविवारच्या रात्री एका वाईन शॉप समोर निर्घृण हत्या करण्यात आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. महेश दिगंबर काकडे असे हत्या झालेल्या अठरा वर्षाच्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण हा नक्षत्रवाडी येथे रहात होता.
रक्ताच्या थारोळ्यातील महेश काकडे यास वैद्यकीय उपचारार्थ घाटीत दाखल करण्यात आले. मात्र तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. सातारा पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी – कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली. स.पो.नि. कराडे पुढील तपास करत असून दारुच्या वादातून हा खून झाला असावा असे म्हटले जात आहे.







