नाशिक – नाशिक जिल्ह्याच्या निफाड नजिक कादवा पुलावरुन ट्रक नदीत कोसळल्याची घटना आज भल्या पहाटे घडली आहे. नशीबाने ट्रक चालकासह त्याच्या सोबत असलेल्या एकाचा जिव वाचला आहे. मात्र ट्रकचे पुर्णपणे नुकसान झाले आहे.
एमएच 17 जीवाय 6253 या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.







