महिला बंदीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

On: September 13, 2021 7:26 PM

जळगाव – पोक्सोसह विविध कलामाखाली उप कारागृहात बंदीवान महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. श्रीमती अनिता राजा चावरे असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या बंदी महीलेचे नाव आहे.

शनीपेठ पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली दाखल गुन्ह्यात अनिता चावरे ही महिला संशयीत आरोपी असून जळगाव उप कारागृहात ती न्यायाधीन बंदी आहे. उप कारागृहातील महिला बराक क्रं. 2 मधे ती दाखल आहे. यावेळी साडीच्या पदराचा काठ कापून गळफास घेत तिने आत्महत्येचा प्रयत्न वेळीच उघडकीस आला. कारागृहमहिला रक्षक उषा मुरलीधर भोंबे यांच्या हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.

या प्रकरणी कारागृह महिला रक्षक उषा भोंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पो.नि. रामदास वाकोडे व स.पो.नि. वाघमारे यांनी भेट दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment