प्रेयसीची हत्या करणारा प्रियकर अटकेत

On: September 14, 2021 12:56 PM

पुणे : चारित्र्याचा संशय घेत प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या करणा-या प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे. पुणे येथील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत रवीवारच्या रात्री सदर घटना घडली होती. सपना दिलीप पाटील असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. या हत्येप्रकरणी प्रियकर राम गिरी यास अटक करण्यात आली आहे.

संजीवनी दत्ता देवकर या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सपना आणि राम गिरी असे दोघे जण हॉटेलात गेले होते. परत येतांना कोळेवाडी येथे राम गिरी याने गाडीतच सपनाच्या पोटात चाकूने भोसकून जखमी केले व लागलीच पसार झाला. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment