घरफोडीचा गुन्हा उघड – अल्पवयीन ताब्यात

On: September 15, 2021 4:32 PM

जळगाव – जळगाव शहरातील तांबापुरा भागात काल घरफोडीचा गुन्हा घडला होता. त्या गुन्ह्यात सरफराज खान पठाण यांच्या घरातील 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या गुन्हयातील एक अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचा एक साथीदार फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

या गुन्ह्यातील आरोपी मेहरुण तलावाच्या जंगल परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांचे गुन्हे शोध पथक रवाना झाले. आरोपींचा शोध घेत असतांना एक अल्पवयीन पथकाच्या हाती लागला. त्याने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून 61 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे.

पोलिसांच्या ताब्यातील अल्पवयीन मुलाचा साथीदार सोनु सलीम शेख रा. फुकटपुरा हा पोलिसांचा सुगावा लागताच पसार होण्यात यशस्वी झाला आहे. लवकरच त्याला ताब्यात घेतले जाणार असल्याचा विश्वास तपास पथकातील कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे. ताब्यातील अल्पवयीनास बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर यापुर्वी एमआयडीसी पोलिस स्टेशनला एक व जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दोन गुन्हे दाखल आहेत.

पो.नि. शिकारे यांनी तयार केलेल्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सुधीर साळवे, पोलिस नाईक इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, पो.कॉ. गोविंदा पाटील व सचिन पाटील यांच्या पथकाने या तपासात सहभाग घेतला. पुढील तपास मुदस्सर काझी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment