पित्याने केली तेरा वर्षाच्या मुलाची हत्या

On: September 16, 2021 8:41 AM

बीड : तिन बायका केल्यानंतर पहिल्या पत्नीच्या नावे असलेली जमीन मिळवण्यासाठी तिच्यापासून झालेल्या तेरा वर्षाच्या मुलाची हत्या बापाने केल्याची घटना उघडकीस आली आहे. तेरा वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याच्या घटनेने बिड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बिड तालुक्यातील खडकी येथील राकेश उमेश वाघमारे असे मयत मुलाचे नाव आहे. मुलाची  हत्या करणारा उमेश वाघमारे हा फरार झाला होता. तो बसने पाटोद्याहून पुण्याकडे जात असतांनाच त्याला नेकनुर व पाटोदा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.

अटकेतील आरोपी उमेश वाघमारे याने तीन लग्न केले असून त्याची पहिली पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली आहे. दुसरीने आत्महत्या करुन आपली जिवनयात्रा संपवली आहे. त्याने तिसरा विवाह केला आहे. पहिल्या पत्नीचा मुलगा आजी आजोबांकडे रहात असून त्याच्या नावावर जमीन असल्याचे आरोपीला समजले. त्या जमीनीच्या लालसेतून त्याने त्याची हत्या केली. त्याला अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment