बेपत्ता तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा

On: September 19, 2021 8:46 AM

धुळे – धुळे तालुक्याच्या चौगाव येथील बेपत्ता महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला होता. भाग्यश्री बेडसे असे सदर तरुणीचे नाव असून शुक्रवारी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. सुरुवातीला या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. मयत भाग्यश्रीचे वडील भटू बेडसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नितीन पाटील या तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौगाव येथील रहिवासी तरुणी भाग्यश्री भटू बेडसे (21) या तरुणीला गेल्या काही दिवसांपासून लोणखेडी येथील नितीन वसंत पाटील हा तरुण त्रास देता होता. त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्याच्या त्रासाला भाग्यश्री वैतागली होती. ती बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेहच विहिरीत आढळून आला. ती बेपत्ता झाल्यानंतर पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद घेण्यात आली होती.

नितीन पाटील या तरुणाने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरुन नितिन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सागर काळे करत आहेत. भाग्यश्री बीसीएसच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होती. संशयीत नितीन पाटील हा मेकॅनिकल विद्याशाखेचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याला अटक करण्यात आली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment