नाशिक – नाशिक शहरातील द्वारका परिसरात आज सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाच्या पाकीटात तिन विविध नावांचे आयडेंटीटी कार्ड मिळून आले असून त्याचे निश्चित नाव समजू शकले नाही.
गणपती विसर्जनाच्या रात्री या तरुणाच्या बाबतीत घातपात झाला असल्याचे म्हटले जात आहे. द्वारका परिसरातील या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस स्टेशनचे तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. मयत तरुण सुमारे तिशीच्या वयोगटातील असून त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याबाबत तपास सुरु असून नागरिकांमधे तर्कवितर्क लावले जात आहे.







