शिल्पाचा पती राज कुंद्रा येणार जेलच्या बाहेर

On: September 20, 2021 6:57 PM

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अश्लिल चित्रफित निर्मीती प्रकरणी दाखल गुन्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून जेलमधे आहे. पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजुर करण्यात आला आहे.

उद्या 21 सप्टेबर रोजी कागदपत्रांची रितसर पुर्तता झाल्यानंतर त्याची जेलमधून सुटका होणार आहे. अश्लिल चित्रफीत तयार करण्यासह ते अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारीत करणे अशा स्वरुपाचे आरोप राज कुंद्रा याच्यावर लावण्यात आले आहेत. जवळपास पंधराशे पानांचे चार्जशिट राज विरुद्ध दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असून आतापर्यंत या गुन्ह्याप्रकरणी अकरा जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment