गोळीबारातील दोघे पोलिसांच्या ताब्यात

On: September 21, 2021 9:51 PM

जळगाव – खून प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर घरी जाणा-या पिता पुत्रावर वाटेत दबा धरुन बसलेल्या दोघा तिघांनी केलेल्या हल्ल्यात मुलगा ठार तर पिता जखमी झाला आहे. गोळीबारासह चॉपरचा हल्ला या घटनेत झाला.

भुसावळ येथील कैफ शेख जाकीर या तरुणाचा 11 ऑक्टोबर 2020 रोजी खून झाला होता. या खून प्रकरणी संशयीत धम्मप्रिया मनोहर सुरळकर हा जळगाव कारागृहात होता. आज धम्मप्रिया याचा जामीन न्यायालयाने मंजुर केला. त्याच्या जामीनासाठी लागणा-या कागदपत्रांची पुर्तता त्याचे वडील मनोहर आत्माराम सुरळकर यांनी केली. त्यानंतर दोघे पिता पुत्र भुसावळच्या दिशेने मोटार सायकलने मार्गक्रमन करत होते.

दरम्यान वाटेत दबा धरुन बसलेल्या दोघा तिघा जणांनी वाटेत नशिराबाद नजीक हल्ला चढवला. या हल्ल्यात गोळीबाराची घटना घडली. गोळीबारात धम्मप्रिया हा ठार झाला. दरम्यान धम्मप्रियाचे वडील मनोहर सुरळकर यांच्यावर चॉपरने हल्ला चढवण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले. सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास महामार्गावर झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. जखमी मनोहर सुरळकर यांच्यावर सुरुवातीला उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा हल्लेखोरांना नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment