जळगाव येथील डॉ. कुणाल नारखेडे बेपत्ता

On: September 21, 2021 10:49 PM

जळगाव – जळगाव येथील बीएसएनएल कार्यालयाच्या समोर श्री सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आहे. या हॉस्पीटलचे डॉ. कुणाल नारखेडे बेपत्ता झाले आहेत. विस मिनीटात परत येतो असे सांगून बाहेर गेलेले डॉ. कुणाल नारखेडे नंतर परत आलेच नाही. स्टाफने बराच वेळ त्यांची वाट पाहिली. मात्र डॉ. नारखेडे परत आलेच नाही.

अखेर त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. 21 सप्टेबरच्या दुपारी बारा वाजेपासून डॉ. कुणाल नारखेडे बेपत्ता असून ते हरवल्याबाबत 30/21 क्रमांकाने मिसींगची नोंद करण्यात आली आहे. तसेच कुणाला काही माहिती असल्यास जिल्हापेठ पोलिस स्टेशनला कळवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. पुढील तपास स.पो.नि. किशोर पवार (मोबाईल क्रमांक 7021677341)करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment