पोलिस अधिक्षकांच्या निरोप समारंभात कोरोना नियम पायदळी

On: September 22, 2021 12:10 PM

उस्मानाबाद – उस्मानाबादचे पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी निवा जैन यांची नियुक्ती झाली आहे. 21 सप्टेबर रोजी मावळते पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांचा निरोप समारंभ झाला. या निरोप समारंभात कोरोना नियमांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली झाली.

पोलिस प्रशासनाकडून सर्वसामान्यांवर कोरोना नियमांचा बडगा उगारुन कायदेशीर कारवाई करण्यात येते. मात्र खुद्द मावळत्या पोलिस अधिक्षकांच्या उपस्थितीतच कोरोना नियमांची पायमल्ली झाली असून याला जबाबदार कोण व कारवाई कोण कुणावर करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मावळते पोलिस अधीक्षक रोशन यांची फुलाने सजवलेल्या वाहनातून मोठी मिरवणूक यावेळी काढण्यात आली. या निरोप समारंभाच्या प्रसंगी अधिकारी व कर्मचा-यांनी गर्दी तर केलीच होती मात्र मास्क कुणी लावले नव्हते. तसेच बहुतेक जण सोशल डिस्टन्स विसरले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment