मोटार सायकल चोरीप्रकरणी एकास अ‍टक

On: September 22, 2021 5:29 PM

जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा मोटार सायकल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे. सागर विलास सपकाळे (19) रा. आसोदा रोड तानाजी मालुसरे नगर जळगाव असे अटक करण्यात आलेल्या मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे.

सागर सपकाळे याने दिलेल्या कबुलीप्रमाणे शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील त्याने केलेला मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. 12 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावरील जान्हवी हॉटेलसमोर उभी असलेली मोटारसायकल सागरने त्याच्या अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने चोरुन नेली होती. याप्रकरणी हर्षल मुरलीधर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या वडीलांच्या मालकीची मोटार सायकल चोरीप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या ताब्यातून होंडा पॅशन कंपनीची काळ्या व लाल रंगाची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपासकामी त्याला शनी पेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या निर्देशाखाली हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील, यांच्या पथकाने या कारवाईत व तपासात सहभाग घेतला. मोटार सायकल चोरीचे अजुन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर कारवाई यापुढे देखील अशीच सुरु राहणार असल्याचे पो.नि.किरणकुमार बकाले यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment