जळगावात अनोळखी इसमाचा मृतदेह

On: September 23, 2021 12:40 PM

जळगाव – जळगाव शहराच्या छत्रपती शिवाजी उद्यान मेहरुण बगीच्यातील विहिरीत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेह विहीरीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गफ्फार तडवी, साईनाथ मुंडे, चंद्रकांत पाटील, नरसिंग पाडवी आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली.

पोलीस मित्र समाधान नाईक व राहुल कोळी यांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यत आले. सदरचा अनोळखी मयत इसम हा गेल्या तीन दिवसापूर्वी विहिरीत पडून मयत झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेह सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

छु मंतर केल्याच्या संशयातून तरुणाची हत्या उघडकीस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment