फायरिंगच्या गुन्ह्यातील अन्य तिघे आरोपी अटक

On: September 23, 2021 11:12 PM

जळगाव – जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत आज सकाळी पुर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची  घटना घडली. या घटनेत दोघे जखमी झाले असून प्राणहाणी टळली. या प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न.208/21 भा.द.वि. 307, 324, 323, 504 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी स्थापन केलेल्या पथकातील सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, सुरज पाटील, राहुल पाटील, पोलिस नाईक प्रितम पाटील, अविनाश देवरे यांनी संशयीत आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे.

मिलींद शरद सकट रा. गेंदालाल मिल जळगाव यास पिंप्राळा हुडको परिसरातून, प्रद्युम उर्फ बंटी नंदु महाले रा. पिंप्राळा व राहुल सुरेश गजरे रा. सिद्धार्थ नगर हुडको या दोघांना भोईटे नगर रेल्वे गेट जवळच्या यश लॉन परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment