शिर विरहीत धड व्हिडीओ प्रकरणी चौकशी व जनजागृती

On: September 25, 2021 11:22 AM

जळगाव : जामनेर तालुक्यातील फत्तेपूर, देऊळगाव गुजरी परिसरात शिर विरहीत धड असलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओ मुळे परिसरातील जनतेच्या मनात भिती निर्माण झाली आहे. शिर नसलेला मुलगा व महिला उलट दिशेने चालत असल्याचा तो व्हिडीओ असून भुत फिरत असल्याचा मजकुर या व्हिडीओत टाकण्यात आला आहे. हा व्हिडीओ बनावटी असल्याचे एकंदरीत दिसत असून चौकशी सुरु आहे.

या प्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला तिघा जणांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीसोबतच पो.नि. अरुण धनवडे यांनी परिसरात स्वत: फिरुन जनजागृती सुरु केली आहे. जनजागृतीच्या माध्यमातून जनतेच्या मनातील भिती घालवण्यासह समांतर तपास देखील सुरु आहे. यातील सत्यता पडताळून पाहिली जात असून चौकशीत दोषी आढळणा-यांवर निश्चीत कारवाई केली जाणार असल्याचे पो.नि. अरुण धनवडे यांनी क्राईम दुनियासोबत बोलतांना म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment