चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून

On: September 26, 2021 10:37 AM

दक्षिण सोलापूर – चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाइप मारुन हत्या केल्याची घटना शनिवारी गुंजेगाव येथे घडली. मनीषा सिध्देश्वर हराळे (36) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी मंद्रूप पोलिसांनी आरोपी पती सिध्देश्वर किसन हराळे यास अटक केली आहे.

गुंजेगाव- शिंगोली रस्त्यामध्ये बंडगरवस्ती असून त्याठिकाणी हराळे कुटुंबाचा रहिवास आहे. या कुटूंबातील सिद्धेश्वर हराळे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दुसऱ्याच्या शेतात कामाला का जाते असे म्हणून तो चारित्र्यावर संशय घेत असे. या कारणावरुन दोघात वाद झाला होता.

या वादातून सिद्धेश्वर हराळे याने तिच्या डोक्यात व डाव्या कानावर लोखंडी पाईपाचे घाव घालून तिला जखमी केले. त्यात तिचा मृत्यू झाला. स.पो.नि. डॉ. नितीन थेटे, उप निरीक्षक सय्यद, पोलिस अंमलदार प्रमोद आसादे आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment