न्यायाधिशांच्या बंगल्यात चोरी करणारे अटक

On: September 28, 2021 10:44 AM

अमरावती – अमरावती येथील एका न्यायाधीशांच्या सरकारी निवासस्थानी 30 जून रोजी चोरीची घटना घडली होती. चोरीच्या या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमधील चौघे चोरटे शहर पोलिसांच्या तपासणीत निष्पन्न झाले होते. सदर चौघा चोरट्यांना ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. ते न्यायालयीन कोठडीत होते.

या चोरीच्या तपासात शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्यांना अमरावती मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे. विनोद तुकाराम चव्हाण (30), दिनेश तुकाराम चव्हाण (23), (दोघे रा. रहाटगाव), ईग्नेश मलप्पा चव्हाण (25), विकास ऊर्फ रंग्या मलप्पा चव्हाण (40), (दोघे रा. वाघोली) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत.

गेल्या महिन्यात या चौघांना ग्रामीण एलसीबी पथकाने अटक केली होती. अटकेतील चौघांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. चौघा चोरट्यांना पोलिस पथकाने न्यायालयासमोर हजर केले असता 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या चौघा चोरट्यांकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment