सोबत रहात नसल्याच्या रागातून तरुणास मारहाण

On: September 28, 2021 3:23 PM

जळगाव : आपल्यासोबत का रहात नाही? या रागातून चौघांनी मिळून तरुणास मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित दिक्षीत, गणेश सोनार, अविनाश राठोड व कृष्णा चौहान असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघा संशयीतांची नावे आहेत.

याप्रकरणी मनिष सुरेश सोनवणे (पिंप्राळा – हुडको) येथील तरुणाने फिर्याद दाखल केली आहे. चौघा जणांनी त्याला आपल्यासोबत का रहात नाही याचा जाब विचारत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच त्याच्या डाव्या डोळ्याजवळ लोखंडी कडे मारुन दुखापत केल्याप्रकरणी भा.द.वि. 324, 323, 427, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. सुनिल सोनार करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment