जळगाव : जळगाव शहरातील न्यु सम्राट कॉलनी येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली आहे. लक्ष्मण अशोक जाधव (27) असे काल रात्री आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यास मयत घोषीत केले. डॉ. श्रावणी हुंबे यांनी दिलेल्या खबरीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ. सचिन मुंडे करत आहेत.







