पॅरोलवरील गुन्हेगाराचा महिलेवर अत्याचार

On: September 29, 2021 11:32 AM

नाशिक : दोन महिलांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या मात्र पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगाराने विधवा महिलेवर तिच्या ब्यूटीपार्लरमध्ये अनाधिकारे जाऊन तिच्या तोंडात कापडी बोळा कोंबत तिचे हात बांधून अत्याचार केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी पवननगर परिसरात उघडकीस आला असून या घटनेप्रकरणी खळबळ माजली आहे.

संशयित गुन्हेगार नितीन सुभाष पवार (रा. पवननगर, सूर्यनारायण चौक, सिडको) याच्याविरुद्ध अंबड पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला असून तो फरार झाला आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment