इच्छा नसतांना पत्नीशी अनैसर्गिक संबंध –पोलिसात गुन्हा

काल्पनिक छायाचित्र

जालना – प्रेमविवाह करुन आणलेल्या पत्नीची इच्छा नसतांना तिच्यासोबत अनैसर्गिक पद्धतीने संबंध करुन त्याचे व्हिडिओ चित्रीकरण पतीने केल्याची घटना जालना तालुक्यात उघडकीस आली आहे. पतीच्या मेहुण्याने देखील पिडीत महिलेवर अत्याचार केल्यानंतर गर्भवती राहिलेल्या पिडीतेचा गर्भपात करण्यात आला.

सध्या औरंगाबाद येथील मुकुंदवाडी येथे रहात असलेल्या पिडीत महिलेने जालना पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिचा छळ करणा-या पती, सासू, दिर, नणंद, नंदोई यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. मारुती खेडकर पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here