एनसीबीच्या छाप्यात आणखी आठ अटकेत

On: October 4, 2021 5:40 PM

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान उर्फ किंग खान याचा मुलगा आर्यन यास एनसीबीने अटक केल्यानंतर क्रुझवरील हाय प्रोफाईल पार्टीचा भंडाफोड झाला आहे. एनसीबीने आज सोमवारी सकाळी पुन्हा छापा टाकला. दुस-यांदा टाकण्यात आलेल्या या छाप्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा आढळून आला आहे. तसेच आणखी आठ जणांना देखील अटक करण्यात आली आहे.

शाहरुखचा मुलगा आर्यन याच्या मोबाईलमधे तपास पथकातील अधिका-यांना काही कोडवर्ड सापडले असून त्यातून अधिक माहिती पुढे येणार आहे.
क्रुझवरील प्रवाशांची यादी तयार करण्यात आली असून त्यातील काही जण फरार होण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांच्या मागावर एनसीबीचे अधिकारी आहेत. त्यातील आठ जण आज सकाळी एनसीबीच्या पथकाला मिळून आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment