चाळीसगाव पाटणा देवी जंगलात गुराख्याची हत्या

On: October 7, 2021 3:57 PM
crimeduniya

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगल परिसरात गुराख्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील (50) असे हत्या झालेल्या गुराख्याचे नाव आहे.

नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील (50) हा गुराखी पाटणादेवी जंगल परिसरात गुरेढोरे सांभाळण्याचे काम करत होता. कुणीतरी अज्ञात हल्लेखोराने नाना पाटील यांची हातपाय बांधून धारधार शस्त्राने डोक्यावर वार करत निघृण हत्या केली आहे. 5 व 6 ऑक्टोबरच्या दरम्यान सदर घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

निलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment