अवैध बायो डिझल साठा करणा-यांविरुद्ध कारवाया

On: October 16, 2021 9:19 PM

जळगाव : एमआयडीसी हद्दीत बायो डीझलचा अवैध साठा बाळगणा-यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आज दोन कारवाया केल्या. दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईप्रकरणी पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर भिकन जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पहिल्या कारवाई दरम्यान एमआयडीसी हद्दीतील जी-35 स्टील क्राफ्ट या कंपनीच्या परिसरात आर्या बायो डीजल या नावाने असलेल्या पंपावर अवैध बायो डीझल साठा आढळून आला. सदर कंपनी मालक राजकुमार रविंद्र महाजन हे असल्याचे कारवाई दरम्यान आढळून आले. या कंपनी परिसरात असलेल्या टाकीत 10 हजार 920 लिटर डीझेलचा 7 लाख 64 हजार 400 रुपये किमतीचा साठा आढळून आला. या प्रकरणी राजकुमार रविंद्र महाजन यांच्याविरुद्ध रितसर कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

दुस-या कारवाईत ऑटो नगर भागातील शांती निकेतन बिल्डींगच्या बाजुला असलेल्या एका ट्रकमधे अवैध बायो डीझलचा साठा आढळून आला. या ट्रकमधे अंदाजे 35 लिटर 2450 रुपये किमतीचे डीझेल, 70 हजार रुपये किमतीची डीझेल विक्री करण्याची इलेक्ट्रॉनिक पंप मशिन, दिड लाख रुपये किमतीची बॅटरी व ट्रक असा एकुण 4 लाख 17 हजार 550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.  प्रताप शिकारे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. गफ्फार तडवी, पो.ना. मुदस्सर काझी, पो.ना. महेश महाले, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. रविंद्र मोतीराया, पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment