सुरा बाळगणा-या तरुणास अटक

On: October 17, 2021 7:22 PM

जळगाव : सोळा इंच लांबीचा सुरा बाळगणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. जयेश संजय नाझरकर (21) रा. के.सी. पार्क गजानन नगर जळगाव असे अटक करण्यात आलेल्या सुरा बाळगणा-या तरुणाचे नाव आहे.

दुर्गादेवी विसर्जन बंदोबस्तकामी एमआयडीसी पोलिस पथकाची ड्युटी होती. त्यावेळी पथकातील कर्मचा-यांना एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेत त्याची विचारपूस करत अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या कमरेला एक सुरा आढळून आला. त्याला सु-यासह ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पो.कॉ. संदीप विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयेश नाझरकर याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.

पो.नि. प्रताप शिकारे यांच्य मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दिपक जमदाडे, हे.कॉ. नितीन पाटील, हे.कॉ. अल्ताफ पठाण, महिला पोलिस कर्मचारी अलका माळी, दिप्ती नेमाडे, सोनी महेकर, होमगार्ड धिरज भगत, होमगार्ड रुपाली इंगळे, सविता गायकवाड आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment